चरणजीत सिंग चन्नी मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध

0
35

चरणजीत सिंग चन्नी यांनी काल पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी झालेल्या सोहळ्यात पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी चन्नी यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच सुखजिंदर सिंग रंधावा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राहुल गांधी आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू उपस्थित होते. दरम्यान, चरणजीत सिंग चन्नी यांनी शेतकर्‍यांसाठी वीज आणि पाणी बिल माफीची घोषणा केली.