पुती गावकर साखळीतून मुख्यमंत्र्यांविरुद्ध लढणार

0
48

>> विधानसभेच्या १८-२० जागा लढविणार

गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत खाण अवलंबित फोरमतर्फे १८ ते २० जागा लढविण्यात येणार आहेत. इतर जागावर भाजपला हरविण्यासाठी कॉंग्रेस किंवा आप या पक्षांना पाठिंबा देण्यात येईल. तसेच आपण स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात साखळी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहे, अशी घोषणा खाण अवलंबित मंचचे निमंत्रक पुती गावकर यांनी काल केली.

पणजी येथील आझाद मैदानावर काल राज्यातील खाण अवलंबित जमा झाले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पुती गावकर यांनी ही घोषणा केली.

ज्या मतदारसंघामध्ये खाण अवलंबित फोरमचे चांगले उमेदवार आहेत, तिथे फोरमतर्फे थेट निवडणूक लढवली जाणार आहे. ज्या मतदारसंघांमध्ये फोरमचे भक्कम उमेदवार नाहीत, तिथे अन्य पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला जाणार आहे. आम आदमी पक्ष, कॉंग्रेस आणि मगोच्या उमेदवारांना पाठिंबा दिला जाईल, असे गावकर यांनी सांगितले. गोवा फॉरवर्डबद्दल विचारले असता, त्या पक्षावर आपला विश्वास नसल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपने राज्यातील खाणी सुरू करण्याचे फक्त आश्वासन दिले. खाण महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासनही फसवे आहे. त्यामुळे नागरिक भाजपविरोधात आहेत. पुढील सरकार हे भाजपचे नसेल, यासाठी आपण झटणार आहे.
पुती गावकर, निमंत्रक,
खाण अवलंबित मंच.