घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

0
84

आज सोमवार दि. १५ फेब्रुवारीपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ होणार असून नवे दर मध्यरात्रीपासून लागू होतील. अलीकडेच पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांना झटका दिला आहे.

याबाबत केंद्र सरकारकडून, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राकृतिक गॅसच्या किमतीत वाढ झालेली असल्यामुळे भारतातही गॅसच्या दरात वाढ जाहीर केली आहे. यामुळे आजपासून १४.२ किलोग्रॅम एलपीजी सिलिंडरमध्ये ५० रुपयांची वाढ होणार आहे. यामुळे नवी दिल्लीत सिलिंडरची किंमत ७६९ रुपये होईल.