गोव्यात सार्वजनिक बस वाहतूक चालू राहणार

0
75

आजच्या देशव्यापी संपामुळे राज्यातील सर्व बँका, विमा कंपन्यांची कार्यालये तसेच सर्व औद्योगिक आस्थापने बंद राहतील. मात्र, सार्वजनिक वाहतूक चालू राहणार आहे.

या संपात गोव्यातील सर्व प्रमुख कामगार संघटना सहभागी होणार आहेत. आय्‌टक, भारतीय मजदूर संघ, इंटक, गोवा म्युनिसिपल एम्प्लोईज युनियन, अखिल भारतीय बँक कामगार संघटना, गोवा राज्य कर्मचारी महासंघ, सिटू, गोवा वीज कर्मचारी संघटना, गोवा सरकारी कर्मचारी समन्वय समिती, कदंब ड्रायव्हर्स अण्ड अलाईड एम्प्लोईज असोसिएशन तसेच गोवा सरकारी कर्मचारी संघटना आदी संघटनानी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.