कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप

0
61

मधंद्यामध्ये कामगारांच्या हितविरोधी केलेले बदल तसेच प्रदीर्घ प्रलंबित मागण्यांकडे केले जाणारे दुर्लक्ष यांच्या विषेधार्थ देशातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी आज दिवसभराचा देशव्यापी बंद पुकारला आहे. यामुळे बँका, सार्वजनिक वाहतूक सेवा, दळणवळण या आवश्यक सेवांवर परिणाम होणार असून सर्वसामान्यांना त्याची झळ सोसावी लागणार आहे.

आजच्या संपात सुमारे १८ कोटी कामगार सहभागी होणार अशी कामगार संघटनांची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या देशव्यापी संपात १४ कोटी कामगार सहभागी झाले होते. केंद्रीय कामगार संघटनांनी केंद्र सरकारकडे किमान वेतन १८ हजार रुपये, भाववाढीवर नियंत्रण, किमान मासिक पेंशन तीन हजार रुपये यासह विविध मागण्याचे १२ कलमी निवेदन बर्‍याच काळापूर्वी दिले होते. मात्र त्याच्या पूर्ततेबाबत चालढकल केली जात असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे आजच्या संपाचे स्वरुप या आधीच्या संपापेक्षा अधिक व्यापक असेल असे ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन कमिटीचे महासचिव एस. पी. तिवारी यांनी सांगितले.
बंदर व नागरी हवाई वाहतुकीशिवाय वाहतूक, दळणवळण व बँकिंग या सेवा ठप्प होणार असल्याचा दावा तिवारी यांनी केला. इस्पितळांमधील व उर्जा प्रकल्पांमधील कामगारही संपावर जाणार आहेत. मात्र त्यांचे सर्वसामान्य काम बंद होणार नाही असेही ते म्हणाले.
कोल इंडिया, गेल, ओएनजीसी, एनटीपीसी, ओआयएल, एचएल, भेल यांचा या संपात सहभाग राहील. तथापि रेल्वे कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर निर्णयासाठी सरकारने आधीच समिती स्थापन केल्याने रेल्वे कर्मचारी संपात सहभागी होणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.