गोवा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेस सुरूवात

0
120

गोवा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यपाल सचिवालयाच्यावतीने गोवा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूच्या निवडीसाठी अर्ज मागविले आहेत. गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वरुण सहानी यांची वर्ष २०१६ मध्ये गोवा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२१ मध्ये पूर्ण होत आहे. गोवा विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूची निवड करण्यासाठी तज्ज्ञाच्या एका खास समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.