गोवा डेअरीच्या दुधदरामध्ये वाढ करण्यात आली आहे. हा वाढ प्रतिलीटरमागे 2 रुपये अशी झाली असून आज सोमवारपासून नवे दर लागू होणार आहेत. मात्र हाय फॅट दुधाचे दर वाढलेले नाहीत. स्टँडर्ड, गायीचे दूध व होमोनाईस्ड टोन दुधावर 2 रुपयांची दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे 29 रुपयांना मिळणाऱ्या अर्ध्या लिटरच्या दूध पिशवीमागे 1 रुपयाची वाढ झाली असून ती पिशवी आता 30 रुपयांना मिळणार आहे.
गाईचे 27 रुपये अर्धा लिटर मिळणारे दूध आता 28 रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे 51 रुपये लिटर मिळणाऱ्या दुधाची पिशवी आता 53 रुपये झाली आहे. ही दरवाढ काल जाहीर केली असून आज सोमवारपासून लागू होणार आहे.