गोवा क्रांतीदिनानिमित्त राज्यपालांकडून शुभेच्छा

0
103


आजच्या ऐतिहासिक गोवा क्रांतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे की, महान स्वातंत्र्यसैनिक डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या लोकांना प्राथमिक नागरी हक्क नाकारल्याबद्दल अभूतपूर्व चळवळ सुरू केली. गोमंतकीयांना एकत्र आणून जुलूमशाही, अत्याचारी, वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी गोमंतकीयांना मारलेल्या हाकेने गोवा मुक्तीलढ्याला एक नवी आणि परिणामकारक दिशा मिळाली आणि गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासामध्ये एक नवा अध्याय सुरू झाला. आजच्या या ऐतिहासिक व अविस्मरणीय दिवशी, आपण राज्याच्या सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी स्वत:ला पुनःसमर्पित करूया, असे राज्यपालांनी म्हटले आहे.