गोवा आदर्श राज्य बनवुया ः मुख्यमंत्री

0
129

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी क्रांतीदिनानिमित्त शुभेच्छा देताना गोवा राज्याचे इतरांनी अनुकरण करावे असे आदर्श राज्य गोव्याला बनविण्यासाठी, आपण प्रगतीच्या दिशेने काम करत राहूया, असे आवाहन केले. यावेळी दिलेल्या संदेशात त्यांनी, गोवा मुक्ती चळवळीच्या इतिहासात या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी १९४६ साली, डॉ. राममनोहर लोहिया यांनी पेटविलेल्या ठिणगीचे रूपांतर गोमंतकीयांच्या मनातील ज्वालेमध्ये झाले. या प्रसंगी आपण स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे व बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहूया. यावर्षी गोवा राज्य आपल्या मुक्तीदिनाचे ६० वे वर्षे साजरे करीत असल्याने या प्रसंगाचा आनंद द्विगुणित झाल्याचे म्हटले आहे.