गोमेकॉसमोरील बेकायदा गाडे जमीनदोेस्त

0
45

>> कडक पोलीस बंदोबस्तात पहाटेपासून कारवाई

बांबोळी येथील गोमेकॉच्या आवाराबाहेर गेले कित्येक वर्षें असलेले बेकायदा गाडे आणि स्टॉल्स प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्तात काल गुरूवारी पहाटे जमीनदोस्त केले. या ठिकाणी काही स्टॉलधारकांकडे त्यांच्या स्टॉल्सबाबत जुजबी कागदपत्रे आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून गोमेकॉच्या बाहेर असलेले हे बेकायदा गाडे व स्टॉल्स हटविण्यासाठी प्रयत्न सुरू होता.

स्थानिक विक्रेत्यांनी आमदारांसमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन सदर गाडे, स्टॉलना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या प्रश्‍नी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. तथापि, प्रशासनाने त्यापूर्वीच हे गाडे हटविले.

व्यावसायिकांचा आक्रोश
गाडे हटविण्यात आल्याने व्यावसायिकांनी एकच आक्रोश केला. कोरोना महामारीच्या काळात कसाबसा कुटुबांचा उदरनिर्वाह चालविला जात होता. आता, गाडे जमीनदोस्त केल्याने उत्पन्नाचे साधन बुडाल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. आपल्याकडे गोमेकॉ, हस्तकला मंडळाने दिलेला परवाना आहे. कुडका पंचायतीमध्ये कर भरतो, असा दावा एक व्यावसायिक बाबलो हळदणकर यांनी केला.