अजूनही नऊ राज्यांत लॉकडाऊन

0
45

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशभरात हाहाकार माजला होता. त्यामळे प्रत्येक राज्याने आपल राज्यापुरता लॉकडाऊन जाहीर केला होता. सध्या देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र अद्यापही धोका टळलेला नाही. अशा परिस्थितीत देशातील १० राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनसारखी स्थिती आहे. यात पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, मिझोराम आणि पुदुच्चेरी यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये गेल्या वेळच्या लॉकडाऊनसारखेच अजूनही निर्बंध आहेत.

२२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत थोड्या प्रमाणात लॉकडाऊन आहे. यात गोवा, महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, नगालँड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, आंध्र प्रदेश आणि गुजरातचा समावेश आहे.

तेलंगणमध्ये आजपासून सर्व शाळा सुरू करण्यात येत आहेत. तेलंगणमध्ये २० जूनपासून लॉकडाऊन हटवला आहे.

कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी
देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत कमी होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात बुधवारी ४८, ४१५ नवीन रुग्ण आढळून आले. तर ६१, ४९४ जण कोरोनातून बरे झाले. ९८८ जणांचा गेल्या २४ तासांत करोनाने मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही १४,०८३ ने कमी झाली आहे. पण केरळमधील रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत केरळमध्ये १३,५०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. यापूर्वी २१ जूनला ही संख्या कमी होऊन ७४४९ पर्यंत पोहोचली होती.