भाजप कार्यकर्ते, शेतकर्‍यांत गाझीपूर येथे हाणामारी

0
44

दिल्ली व उत्तर प्रदेशच्या सीमेवर गाझीपूर येथे भाजपचे कार्यकर्ते आणि कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांत बुधवारी हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय किसान युनियनच्या २०० जणांवर एफआयआर दाखल केला आहे. या हाणामारीमध्ये दोन्ही बाजूचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांनी भाजप नेते अमित वाल्मिकी यांच्या तक्रारीवरून एफआयआरची नोंद केली आहे. वाल्मिकी यांच्या स्वागताच्यावेळी हा वाद उफाळला होता. वाल्मिकी यांनी पोलिसांत लेखी तक्रार नोंदवली व भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला. तक्रार दाखल झाल्यानंतर एफआयआर नोंदवला गेला आहे.