गोमंतकीय दुसर्‍या लाटेचाही सामना करतील ः डॉ. बांदेकर

0
188

राज्यातील आरोग्य सेवकांना कोविडची लस देण्यात आलेली असल्याने आता राज्यात कोविडची दुसरी लाट आली तरी गोवा त्या लाटेचा चांगल्या प्रकारे सामना करू शकेल, असा विश्‍वास काल गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी व्यक्त केला.

ज्या आरोग्य सेवकांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे त्यांची कोविड विरुद्ध लढण्यासाठी १४ दिवसांच्या आत पूर्ण प्रतिकारशक्ती निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.
गोव्यात जर कोरोनाची दुसरी लाट आली तर कोविडची लस घेतलेले आरोग्य सेवक पूर्ण क्षमतेने काम करू शकतील, असे सांगून ही आमच्यासाठी मोठी जमेची बाब असल्याचे ते म्हणाले. लोकांनी मास्क परिधान करणे, हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आदी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा, अशी सूचनाही डॉ. बांदेकर यांनी केली.