गेल्या तीन महिन्यात १५ इंच पावसाची नोंद

0
110

राज्यात यावर्षी मार्च २०२१ ते मे २०२१ या तीन महिन्यांच्या काळात १५.५२ इंच मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली आहे. मागील ७० वर्षातील सर्वाधिक तिसर्‍या क्रमांकाच्या मान्सूनपूर्व पावसाची नोंद यावर्षी झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने काल दिली.

राज्यात वर्ष १९६१ मध्ये सर्वाधिक २६.०७ इंच मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर वर्ष २००६ मध्ये २३.३० इंच पावसाची नोंद झाली होती. मागील दोन वर्षांत मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण कमी झाले होते. यावर्षी तोैक्ते चक्रीवादळामुळे मान्सूनपूर्व पाऊस पडला. सध्या देखील अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.