वाढते घटस्फोट रोखण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशनाचा निर्णय

0
78

>> कायदामंत्री नीलेश काब्राल यांची माहिती

राज्यात घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. राज्य सरकारने या पार्श्‍वभूमीवर विवाह नोंदणीसाठी अर्ज करणार्‍या वर-वधूंचे विवाहपूर्व समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कायदा, वीज, पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात घटस्फोट प्रकरणांचे प्रमाण वाढत असून, विवाह नोंदणीसाठीची पहिली सही झाल्यानंतर वर-वधूंचे समुपदेशन केले जाणार आहे, असे काब्राल यांनी सांगितले. निबंधक खात्याकडून प्रत्येक तालुक्यात नागरी सेवा केंद्रे सुरू केली जाणार आहेत. निबंधक खात्याच्या सर्व सेवांसाठी ऑनलाइन शुल्क भरण्याची सोय केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

वीज बिलांसाठी ‘एटीपीएम’ची सुविधा
वीज खात्याने पणजी येथील विद्युत भवनात ग्राहकांना वीज बिलांचा भरणा करण्यासाठी ‘एटीपीएम’ यंत्राची व्यवस्था केली आहे. राज्यभरात वीज ग्राहकांच्या सोयीसाठी आणखीन १२ यंत्राची व्यवस्था लवकरच केली जाणार आहे. दोन नवीन जीआय ३३ केव्ही वीज केंद्रांची पायाभरणी करण्यात आली आहे. तसेच, चार नवीन वीज केंद्राचे लोकार्पण करण्यात आले आहे, अशी माहिती काब्राल यांनी दिली.