गुरूवारी कोरोनाने एकही मृत्यू नाही

0
90

राज्यात चोवीस तासांत नवीन ४५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, आणखी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५४,११३ एवढी झाली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८४ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ७७६ एवढी आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आणखी ५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण ५२ हजार ६५३ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३० टक्के एवढे आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन २५ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

चोवीस तासांत १६३४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील २.७५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ८७ झाली आहे. पणजीत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ५७ झाली आहे. पर्वरी येथील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ४३ झाली आहे. केपे येथे ४५ रुग्ण आणि कुडतरी येथे ४४ रुग्ण आहेत.