आयएएस अधिकार्‍यांचा सत्कार हा खासगी दौरा नव्हे ः कोश्यारी

0
96

>> विमानप्रकरणावर राज्यपालांची प्रतिक्रिया

आयएएस अधिकार्‍यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा काय असू शकतो? असा सवाल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपस्थित केला. डेहराडूणला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले असता सरकारी विमानाने प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली. यामुळे राज्यपाल खासगी विमानाने डेहराडूणला पोहोचले. डेहराडूणला पोहोचल्यानंतर राज्यपालांनी हा सवाल केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांचा बुधवारी मसूरी येथे नियोजित दौरा होता. त्यानुसार ते मुंबईत शासकीय विमानात बसले. मात्र, १५ मिनिटानंतर त्यांना या विमानातून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.

या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री सचिवालयाने राज्यपाल सचिवालयाने विमान उपलब्धतेची खातरजमा करायला हवी होती असे सांगितले.
दरम्यान, यानंतर राज्यपाल खासगी विमानाने तिकिट बूक करून डेहराडूणला रवाना झाल्याचे राजभवनकडून सांगण्यात आले.