गुटखा उत्पादकावर आयकर छापे

0
63

आयकर खात्याने एका बड्या गुटखा, पानमसाला उत्पादकाच्या देशभरातील आस्थापनांवर छापे मारून जवळजवळ दीड हजार कोटींच्या बेहिशेबी संपत्तीचा छडा लावला आहे. सदर व्यावसायिक हॉटेल उद्योगातही आहे. गेल्या आठ फेब्रुवारीपासून तेरा फेब्रुवारीपर्यंत हे छापे मारले गेले. व्हर्जिन आयलंड आणि दुबईतही या व्यावसायिकाची मालमत्ता असल्याचे आढळले आहे. कर्मचार्‍यांना भागधारक असल्याचे दाखवून कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केली जात असे असे आयकर विभागाचे म्हणणे आहे.