गार्डियन एन्जलला विजयाचे पूर्ण गुण

0
83

गोवा प्रोफेशनल लीग
घानाचा आघाडीपटू आबेल हम्मोंडने पहिल्या सत्रात नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर कुडचडेच्या गार्डियन एन्जल स्पोटर्‌‌स क्लबने एफसी गोवा संघावर १-० अशी मात करीत धुळेर स्टेडियवर खेळविण्यात आलेल्या जीएफएच्या प्रो-लीग सामन्यात पूर्ण गुणांची कमाई केली. मायरन बॉर्जीसने घेतलेल्या क्रॉस पासवर एफसी गोवाचे बचावपटू चेंडू अचूकपणे थोपवू शकले नाही आणि त्याचा पुरेपुर फायदा उठवित आबेल हम्मोंडने एफसी गोवाचा गोलरक्षक इप्रोतिप दासला कोणतीही संधी न देता संघाला पूर्ण गुण मिळवून देणारा एकमेव गोल नोंदविला.