पेन, मार्श ऑस्ट्रेलिया संघात

0
100

यष्टिरक्षक फलंदाज टिम पेन, फलंदाज कॅमेरून बँनक्रॉफ्ट व शॉन मार्श यांची २३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ऍशेस कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. या तिघांना मॅथ्यू वेड, मॅट रेनशॉ व ग्लेन मॅक्सवेल यांच्या जागी स्थान देण्यात आले आहे. वडिलांच्या निधनामुळे अष्टपैलू मार्कुस स्टोईनिस याचा विचार करण्यात आलेला नाही. २०१० साली स्टीव स्मिथ व टिम पेन यांनी पाकविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. यानंतर पेनला मिळालेल्या अल्प संधींचा फायदा उठविता न आल्याने संघाचा नियमित सदस्य बनता आले नाही तर दुसरीकडे स्मिथने गोलंदाजीकडून फलंदाजीकडे मोर्चा वळविताना संघातील स्थान भक्कम केले. सध्या शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत पेनने उत्कृष्ट यष्टिरक्षणाचे व बँनक्रॉफ्टने फलंदाजीचे दर्शन घडविल्याने केवळ फॉर्मच्या आधारावर त्यांची निवड करण्यात आली आहे. चाड सेयर्स याचादेखील १३ समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया संघ (पहिली कसोटी) ः स्टीव स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरून बँनक्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, पीटर हँड्‌सकोंब, शॉन मार्श, टिम पेन, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन लायन, जोश हेझलवूड, जॅकसन बर्ड व चाड सेयर्स.