आयएसएलच्या चौथ्या पर्वास गोलशून्य बरोबरीने प्रारंभ

0
108

हीरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील पहिला सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. यजमान केरळा ब्लास्टर्सने गतविजेत्या कोलकत्याच्या एटीके संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले. बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. शानदार उद्घाटन सोहळ्यानंतर सुरू झालेल्या लढतीत पहिल्या ४५ मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. केरळा ब्लास्टर्सने सुरवात आक्रमक केली, पण नंतर त्यांना वर्चस्व राखता आले नाही.
तुलनेत एटीकेचे सामन्यात ५७ टक्के चेंडूवर नियंत्रण राहिले. लढतीत दोन्ही संघांना गोल करण्याच्या संधी होती, मात्र नेमबाजी अचूक नव्हती. केरळा ब्लास्टर्सला गोल करण्याची अधिक संधी होती. एटीकेच्या जोस ब्रान्को यालाही अचूक नेम साधता आला नाही. त्यामुळे टेडी शेरिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला एका गुणावर समाधान मानावे लागले.