गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल शुक्रवारी झालेल्या चकमकीत पोलिसांकडून १३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. येथील जंगलात ही चकमक झाली. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटने ही कारवाई करण्यात आली.
या भागातील जंगलात अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असणार्या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोहोचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार सुरू केला. या चकमकीत १३ नक्षल ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. चकमक अजूनही सुरू असून मृतदेह एकत्र करण्याचे काम सुरू आहे. सध्याजरी १३ नक्षलवादी ठार झाले असले तरी अजून आकडा निश्चित कळलेला नाही.
कसनसुर येथे नक्षलवादी दल एकत्र आले होते. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्सल तेंदू कंत्राटदार यांच्याकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची बेठक सुरू असल्याची माहिती खबर्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर रात्रीपासून पोलिसांनी अभियानाची तयारी सुरू केली होती. याच अभियानादरम्यान शुक्रवारी सकाळपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती.