म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी गोमेकॉत खास वॉर्ड ः आरोग्यमंत्री

0
98

गोमेकॉमध्ये म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांसाठी २० खाटांचा समावेश असलेल्या खास वॉर्ड सुरू केला जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

गोमेकॉमध्ये काळ्या बुरशीचे एकूण सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एका रुग्णाचे निधन झाले आहे. तर, पाच जणांवर उपचार सुरू आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत, असेही आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला योग्य प्रकारे तोंड देण्यासाठी नियोजन करण्यास सुरुवात करण्यात येत आहे. सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये ६० खाटांचा समावेश असलेला पेडियाट्रिक आयसीयू विभाग सुरू करण्यात येणार आहे. तिसर्‍या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.