गजानन रायकर पंचत्वात विलीन

0
45

गोवा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गजानन रायकर यांच्या पार्थिवावर काल मडगावातील मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र पराग रायकर यांनी पार्थिवाला अग्नी दिला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काल गजानन रायकर यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यात माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार रवी नाईक, मडगावचे नगरसेवक सदानंद नाईक, घन:श्याम शिरोडकर, बबिता नाईक, तसेच वामन प्रभुगावकर, अविनाश शिरोडकर, अनंत अग्नी, सुनील नाईक, प्रशांत नाईक, मोहनदास लोलयेकर आदींचा समावेश होता.