कोरोनाने दोघांचा मृत्यू; ८४ नवे रुग्ण

0
29

कोविडमुळे काल राज्यातील दोघा जणांचा मृत्यू झाला, तर नवे ८४ कोरोना रुग्ण सापडले. काल राज्यभरात कोविडसाठी ४१०२ जणांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी ८४ जणांचे नमुने बाधित सापडले. गेल्या २४ तासांत राज्यात कोविड पॉझिटिव्हीटी दर हा २.०४ टक्के एवढा होता. गेल्या २४ तासांत ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही ९६५ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२९९ एवढी झाली आहे, तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.५८ एवढी आहे. काल इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ही ७ एवढी होती, तर इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ही १३ एवढी आहे. दरम्यान, मडगाव शहरातील रुग्णांमध्ये अन्य भागांपेक्षा जास्त वाढ होत असून सर्वाधिक १२६ रुग्ण आहेत.