खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्‍चित

0
113

खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींच्या कमाल किमती किती असतील, हे केंद्र सरकारने निश्चित करून दिले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना देखील सरकारने ठरवून दिलेल्या दरानेच लसीची विक्री करता येणार आहे.

केंद्र सरकारने मंगळवारी रात्री या संदर्भात परिपत्रक काढले असून, त्यानुसार कोविशिल्ड लसीच्या एका डोससाठी खासगी रुग्णालयांना ७८० रुपये आकारता येणार आहेत. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या डोससाठी १४१० रुपये आकारता येणार आहेत, तर रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीसाठी ११४५ रुपये आकारता येणार आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या नावाखाली रुग्णांची लूट करणार्‍या खासगी रुग्णालयांना चाप बसणार आहे. लसींच्या किमतींवर ५ टक्के जीएसटी लागू केल्याचेही या परिपत्रकात नमूद केले आहे.