खाण व्यवसाय सुरू करण्याची मायनिंग पीपल्स फ्रंटची मागणी

0
283

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटच्या एका शिष्टमंडळाने भेट घेऊन चालू हंगामात राज्यातील खाण व्यवसाय सुरू करण्याची मागणी काल केली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी खाण प्रश्‍नी मायनिंग फ्रंटच्या खाण व्यवसाय सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावावर विचारविनिमय करण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले आहे.

राज्य सरकारकडून खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती गोवा मायनिंग फ्रंटच्या शिष्टमंडळाला दिली आहे. राज्यातील बंद असलेला खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत मायनिंग फ्रंटने एक प्रस्ताव तयार केला आहे. त्यांच्या प्रस्तावावर चर्चा केली जाऊ शकते, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील खाणप्रश्‍नी मुख्य सचिव, खाण सचिव, सरकारी वकील यांच्यासमवेत मायनिंग फ्रंटच्या शिष्टमंडळाची एका बैठक पुढील आठवड्यात घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री जॉ. सावंत यांनी दिले आहे, अशी माहिती फ्रंटचे पुती गावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यकडे खाण प्रश्‍नी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. खाण व्यवसाय कशा पद्धतीने सुरू केला जाऊ शकतो याबाबत माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे, असेही गावकर यांनी सांगितले.