खाणपट्ट्यांच्या नूतनीकरणाची लोकायुक्तांनी चौकशी करावी

0
192

गोवा फाऊंडेशनने लोकायुक्तांकडे सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केलेल्या ८८ खाणपट्ट्यांचे नूतनीकरण प्रकरणी तक्रार काल दाखल केली असून लोकायुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१५ या काळात खाणपट्ट्यांचे नूतनीकरण करण्यात आले होते. तक्रारीमध्ये माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी खाण सचिव पवनकुमार सेन, खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

राज्य सरकारला बेकायदा खाणपट्ट्यांच्या नूतनीकरणामुळे १,४४,००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, गोवा फांऊडेशनने मुख्य सचिव आणि खाण सचिवांना नोटीस बजावून खाण मालकांकडून ६५,००० कोटी वसूल करण्याची मागणी केली आहे.
गोवा फाऊंडेशनने खाणपट्ट्यांचे नूतनीकरण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.