खाणींच्या परिसरातील पाणी शेतीसाठी सोडण्याचा आदेश

0
184

उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांनी खाण मालकांना खाण क्षेत्रातील जलसाठा शेती, पिण्यासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचे पालन करण्यास दिरंगाई केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील काही भागात खाण क्षेत्रातील जलसाठा शेती, बागायतीसाठी सोडला जातो. तसेच काही ठिकाणी खाणीतील पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १६ मार्चपासून खाण उत्खनन बंदी लागू करण्यात आली आहे. खाण बंदीमुळे लीजधारकांकडून खाण क्षेत्रातील पाणी बाहेर सोडणे बंद केले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांनी वरील आदेश जारी केला आहे.