१८-४४ वयाच्या लसीकरण ऍपवर परराज्यातील नागरिकांची नोंदणी

0
111

राज्यातील १८ ते ४४ या वगोगटातील लसीकरणासाठी ऍपवर परराज्यातील नागरिक नोंदणी करीत असल्याचे आढळून आले आहे. राज्य सरकारचे या प्रकाराविरोधात आवश्यक कारवाईसाठी लक्ष वेधण्यात आले आहे, अशी माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी काल दिली.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. या लसीकरणासाठी कोविन ऍपवर नोंदणी करून घेतली जात आहे. या लसीकरणासाठी परराज्यातील नागरिक ऍपवर नोंदणी करीत असल्याचे आढळून आल्याने आवश्यक कारवाई करण्यासाठी सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना दिली जाणारी लस राज्य सरकारकडून खरेदी करण्यात आलेली आहे, असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले.

आणखी ३६ हजार लशीचे डोस
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची पुढील फेरी जून महिन्यात घेतली जाणार आहे. राज्य सरकारला १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आणखी ३६ हजार ५८० लशी प्राप्त होणार आहेत. या वगोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात ३२ हजार ८७० डोस प्राप्त झाले आहेत. असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले.