कोविड उपचारांसाठी खासगी इस्पितळ शुल्कात २०% कपात

0
147

राज्य सरकारने एका आदेशाद्वारे राज्यातील खासगी इस्पितळात कोविड उपचारासाठी २० टक्के कपात करत सुधारित शुल्क जाहीर केलेले आहे.त्यानुसार आता जनरल वॉर्डसाठी १० हजार रुपयांऐवजी प्रतिदिन ८ हजार रुपये असे आहे. हे शुल्क खाली आणले असून त्यामुळे खासगी इस्पितळांत उपचार घेणार्‍या गरीब रुग्णांना या सुधारित दरांमुळे दिलासा मिळणार आहे.

जे रुग्ण व्हेंटिलेटरवर अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत त्यांना आता प्रतिदिन २४ हजार रुपयांऐवजी १९,२०० एवढे शुल्क भरावे लागणार आहे. गोवा सरकारने अतिदक्षता विभागातील उपचारासाठी गेल्या सप्टेंबर २०२० ला जे दर निश्‍चित केले होते त्यापेक्षा हे दर २० टक्क्यांनी कमी आहेत. खासगी स्वतंत्र खोल्यांसाठी पूर्वी जे दर १६,००० रुपये एवढे होते ते आता १२,८०० रुपये एवढे करण्यात आले आहेत.
पूर्वी दोघाजणांना विभागून एका ठिकाणी उपचार घेण्यासाठी जे १३,००० रुपये प्रतिदिन एवढे दर होते ते आता १०,४०० रुपये एवढे करण्यात आले आहेत.

खासगी इस्पितळात गरीब कोविड रुग्णांना उपचार घेणे परवडत नसल्याने व खाजगी इस्पितळांचे दर हे त्यांच्या आवाक्याबाहेरील बनले असल्याच्या लोकांच्या तक्रारी होत्या. त्या लक्षात घेऊन हे दर खाली आणण्यात आले आहेत.