शुक्रवारी १२ मृत्यूंसह १४२० बाधित

0
129

>> सध्याची कोरोना रुग्णसंख्या ११ हजारांवर, बळी ९७६

राज्यात कोरोना महामारीची परिस्थिती गंभीर असून गेल्या चोवीस तासांत आणखी १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच, नवीन १४२० बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या ११ हजार ०४० एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ९७६ एवढी झाली आहे.

२४ तासांत १४६ जण इस्पितळात
राज्यातील कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येबरोबरच इस्पितळांत दाखल होणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत १४६ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.

मडगाव, कादलीत १००० वर रुग्ण
मडगावातील रुग्णवाढ कायम असून मडगावातील रूग्णसंख्या ११६६ एवढी झाली आहे. कांदोळी भागातील रूग्णसंख्या १ हजार झाली आहे. एकूण कोरोना रूग्णसंख्या ७३,६४४ एवढी झाली आहे.

५९६ जण कोरोनामुक्त
राज्यात काल आणखी ५९६ रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ६१ हजार ६२८ एवढी झाली आहे. चोवीस तासांत ३६०७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

पाचजणांचा पाच तासांच्या आत मृत्यू
राज्यात शुक्रवारी आणखी १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गोमेकॉमध्ये १० रुग्ण आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दोघांचा मृत्यू झाला. बार्देश येथील ६५ वर्षीय महिला, कुडचडेतील ६७ वर्षीय महिला, पेडण्यातील ७० वर्षीय पुरुष, वास्कोतील ७७ वर्षीय पुरुष, कळंगुटमधील ५६ वर्षीय महिला व ६२ वर्षीय पुुरूष, कोलकातातील ५१ वर्षीय महिला, शिवोलीतील ५५ वर्षीय पुरुष, हणजूणमधील ८५ वर्षीय पुरुष, डिचोलीतील ५७ वर्षीय महिला व सिंधुदुर्गातील २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला