गोमेकॉतील १५ डॉक्टर कोरोनाबाधित

0
149

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळातील कमीत कमी १५ डॉक्टर कोरोना बाधित झाले असून आणखी ८ डॉक्टरांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे आहेत. त्यांच्या कोविड चाचणीच्या स्वॅबचा अहवाल प्रतीक्षेत आहे. कोरोनाबाधित झालेल्या डॉक्टरांना विलगीकरणाची सोय नसल्याने गैरसोय होत असून कोरोनाबाधित झालेल्या डॉक्टरांना विलगीकरणासाठी वेगळी व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी गोमेकॉच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आरोग्य सचिवांना पाठविलेल्या एका निवेदनात काल केली आहे.

कोरोनाबाधित झालेल्या डॉक्टरांच्या विलगीकरणासाठी वेगळ्या जागेची आवश्यकता आहे. कोरोनाचा आणखी फैलाव होण्याची शक्यता असल्याने त्यांना हॉस्टेलमध्ये सामावून घेतले जाऊ शकत नाही. कोरोनाबाधित झालेल्या डॉक्टरांकडे विलगीकरणासाठी वेगळी जागा नाही, असे निवेदनात म्हटले आहे.