Home बातम्या कोलकाता न्यायालयाकडून ममतांना ५ लाखांचा दंड

कोलकाता न्यायालयाकडून ममतांना ५ लाखांचा दंड

0

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोलकाता उच्च न्यायालयाने ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ममता बॅनर्जी यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीतून जस्टीस कौशिक चंदा हे भाजपशी संबंधित असून त्यांना हटवण्याची मागणी केली होती. यासंदर्भात न्यायालयाने निर्णय देताना ममतांनी न्यायालयाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.