एकनाथ खडसे यांना ईडीने बजावले समन्स

0
94

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना काल अखेर ईडीने समन्स बजावले. ईडीने चौकशीसाठी खडसे यांना आज गुरूवारी ११ वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गिरीश चौधरी यांना काल ईडीने अटक केली आहे.

गिरीश चौधरी यांना पाच दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान चौधरी यांची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीला आता एकनाथ खडसे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. यामुळे ईडीने एकनाथ खडसे यांना समन्स धाडले आहे.

मनी लॉंड्रिंगप्रकरणी गिरीश चौधरी यांची ईडीने १३ तास कसून चौकशी केली. त्यानंतर रात्री त्यांना अटक केली. आता माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.