कोरोनामुळे चोवीस तासांत राज्यात ७४ नवे बाधित

0
41

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाची बाधा झालेले ७४ रुग्ण सापडले आहेत. मात्र गेल्या चोवीस तासांत कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नाही. तसेच गेल्या चोवीस तासांत १०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ८५४ झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२१० एवढी आहे. कोविड पॉझिटिव्हिटी दर १.५ टक्क्यांवर पोहोचला आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६७ टक्के एवढे आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ११ एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत इस्पितळांत भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ११ एवढी आहे.