कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारीही घट

0
59

>> चोवीस तासांत ४५६ रुग्ण, १६ जणांचा मृत्यू

राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काल आणखी घट दिसून आल्याने राज्यासाठी ती दिलासादायक बाब ठरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४५६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. गेल्या सलग चार दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५०० पेक्षा कमी नोंद झाली असून . राज्यात आता कोरोनाचा संसर्ग झालेले ५७९० एवढे सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोनाने १६ जणांचा मृत्यू
गेल्या २४ तासांत राज्यात कोविडमुळे १६ जणांचा बळी गेला आहे. मंगळवारी १४ जणांचा बळी गेला होता. राज्यात आतापर्यंत कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता २८७७ एवढी झाली आहे.

दोघांच्या मृत्यूंची उशिरा नोंद
गेल्या दि. ५ मे ते १५ मे २०२१ या दरम्यान कोविडमुळे झालेल्या आणखी दोघा जणांची मडगाव येथील एका खासगी इस्पितळाने सरकारला उशिरा माहिती दिल्याचे काल आरोग्य खात्यातील सूत्रांनी स्पष्ट केले.

गेल्या २४ तासांत ५४९ कोरोना मुक्त
गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५४९ एवढी आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी सध्या ९४.६१ टक्के एवढी आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५२०७३ एवढी आहे. तर आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १६०७४० एवढी आहे. आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या २७२८४ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत ८५४९५८ एवढ्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

काल इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५७ एवढी होती. तर ६६ नव्या रुग्णांना इस्पितळात उपचारांसाठी भरती करण्यात आले. सध्या सर्वांत जास्त रुग्ण मडगाव शहरात असून त्यांची संख्या ४६३ एवढी आहे. त्यापाठोपाठ फोंडा शहरात ४४५ रुग्ण आहेत. पणजीत ३०३, चिंबल येथे २४६, पर्वरी २४०, पेडण्यात २३८, कुठ्ठाळी येथे २२८, वास्को १९५, कुडचडे १७७, काणकोण १३४, लोटली १८३, केपे १६९ अशी कोविड रुग्णांची संख्या आहे.