कोरोनाने एकाचा मृत्यू, ११२ नवे रुग्ण

0
129

राज्यात चोवीस तासांत नवीन ११२ कोरोना रुग्ण आढळून आले. तसेच काल एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना बळीची एकूण संख्या ७३५ एवढी झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५० हजार ८८४ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ९५० एवढी झाली आहे.

म्हापसा येथील आझिलो इस्पितळात एका ९३ वर्षीय महिलेचे निधन झाले आहे. सदर महिलेला २१ डिसेंबरला इस्पितळात दाखल करण्यात आली होती.
राज्यातील आणखीन ११६ कोरोना रुग्ण बरे झाले आहे. बरे झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार १९९ एवढी झाली असून कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६९ टक्के एवढे आहे.

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी ६७ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारलेल्याची संख्या २६ हजार ६१८ एवढी झाली आहे. इस्पितळात नवीन २४ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
राज्यात २५ डिसेंबरनंतर तीन दिवसात कोविड स्वॅबच्या तपासणीमध्ये घट झाली. २९ रोजी १८३८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ९० रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ६५ रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ६४ रुग्ण, पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ६९ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागांतील सध्याच्या रुग्णांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे.

ब्रिटनमधून आलेल्या काही कोरोना रुग्णांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.