जिल्हा पंचायत अध्यक्षांची ८ रोजी निवड

0
137

राज्यातील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड येत्या ८ जानेवारी २०२१ रोजी करण्यात येणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या मार्च महिन्यात पुढे ढकलण्यात आलेली जिल्हा पंचायत निवडणूक नुकतीच घेण्यात आली असून निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही जिल्हा पंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. आता दोन्ही जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.