कोरोनाचा देशवासीयांकडून धैर्याने सामना सुरू ः मोदी

0
117

>> मन की बातमध्ये पंतप्रधानांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी आपल्या ७७ व्या मन की बात कार्यक्रमातून कोरोनाचा संपूर्ण देशाने मोठ्या धैर्याने सामना करत सांगितले. संपूर्ण देश करोनाविरोधात पूर्ण ताकदीने लढत आहे. कोरोना ही गेल्या शतकातील सर्वात मोठी महामारी आहे. महामारीच्या या संकटात भारत अनेक नैसर्गिक आपत्तींचाही धैर्याने सामना केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोना संसर्गात ज्यांनी आपल्या जीवलगांना गमावले आहे त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. आपण सर्व या कठिण परिस्थितीत त्यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत. आव्हान कितीही मोठे असो भारताचा विजय संकल्पही तेवढाच मोठा असतो. देशाची सामूहिक शक्ती आणि आपल्या सेवाभावाने देशाला प्रत्येक वादळातून बाहेर काढले असल्याचे मोदींनी सांगितले. प्राणवायू टँकर चालक म्हणजे देवदूतच आहे. हे मोठ्या जबाबदारीचे काम आहे. यात मानसिक दबाव असतो हे आम्ही समजू शकतो, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

प्राणवायूची वाहतूक अधिक जलद आणि सुरळीत करण्यासाठी रेल्वेकडून प्राणवायू एक्स्प्रेस चालवली जात आहे. महिला पायलट शिरिजा गजनी यांचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. कोरोनाविरोधातील लढाई खूप मोठी आहे. रेल्वेप्रमाणे आपला देश जमीन, हवाई आणि जलमार्गांद्वारे काम करत असल्याचे यावेळी मोदी म्हणाले. आपल्या सर्व संस्था एकजुटीने काम करत आहेत. अनेक शास्त्रज्ञ, औद्योगिक तज्ज्ञ आणि तंत्रज्ञ युद्धपातळीवर काम करत आहेत, असे मोदी म्हणाले. सामान्यपणे आपल्याकडे ९०० मेट्रीक टन लिक्वीड ऑक्सिजनचे उत्पादन केले जात होते. आता हे उत्पादन १० पटीने वाढले आहे. दिवसाला जवळपास ९५०० टन लिक्लिड ऑक्सिजनचे उत्पादन होत असल्याची माहिती यावेळी पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.