Home बातम्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ डिजिटल चळवळीचा उदय

‘कॉक्रोच जनता पार्टी’ डिजिटल चळवळीचा उदय

0

काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात, असे वक्तव्य सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका सुनावणीवेळी केले. या वक्तव्यावरुन जोरदार वादंग झाला. यातून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) ही व्यंगात्मक राजकीय चळवळ जन्माला आली आहे. विशेष म्हणजे ही चळवळ सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत 60 लाखांहून अधिक सदस्यांनी या चळवळीत सहभाग नोंदवला आहे. एवढेच नव्हे तर भारतात सध्या हा व्हायरल होणाऱ्या ट्रेंड पैकी एक ठरत आहे. सरन्यायाधीश यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी म्हणून या डिजिटल चळवळीचा उदय झाला. ही डिजिटल चळवळ महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी अभिजीत दीपके यांनी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. अगदी थोड्याच कालावधीत या चळवळीला अनेकांनी जोरदार पाठिंबा दिल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे इंस्टाग्रामवर 60 लाखांहून अधिक आणि ‘एक्स’वर जवळपास एक लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. अधिकृत नोंदणी नसलेल्या या पार्टीची समाज माध्यमांमध्ये मात्र प्रसिद्धी वाढत असल्याचे चित्र आहे. काही राजकीय नेत्यांनी देखील या चळवळीला पाठिंबा दर्शवला आहे.