Home बातम्या कॉंग्रेस विधिमंडळ गटाची आज बैठक

कॉंग्रेस विधिमंडळ गटाची आज बैठक

0

>> विधानसभा अधिवेशन रणनीती आखणार

गोवा विधानसभेच्या जुलै महिन्यात होणार्‍या विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस विधिमंडळ गटाची महत्त्वाची बैठक सोमवार दि. २५ जून रोजी सकाळी पर्वरी येथे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या चेंबरमध्ये घेण्यात घेण्यात येणार आहे.
आगामी विधानसभा अधिवेशनात उपस्थित करण्यात येणार्‍या विविध महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे. मतदारसंघातील विकासकामे प्रशासकीय कामकाज, नोकरभरती, वीज आदी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कॉंग्रेस आमदारांच्या मतदारसंघांतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी मागील महिन्यात सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसमवेत बैठक घेतली होती. मतदारसंघांतील विकासकामांच्या प्रगतीची आढावा घेतला जाणार आहे. आगामी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्याच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.