केशकर्तनालये खुली करण्यासाठी व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0
118

राज्यातील केशकर्तनालये खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करणारे पत्र अखिल गोवा सलून मालक संघटनेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनाही लिहिले आहे. दि. २९ एप्रिल २०२१ पासून राज्यातील सर्व केशकर्तनालये, स्पा, मसाज पार्लर्स तसेच ब्युटी पार्लर्स बंद आहेत. सरकारने मॉलमधील दुुकाने उघडण्यास जशी परवानगी दिली आहे तशीच निदान राज्यातील केशकर्तनालये तरी खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी संघटनेने या पत्राद्वारे केली आहे.

केशकर्तनालयांचा वेगळ्या व अत्यावश्यक सेवेत समावेश करून ती खुली करावीत अशी मागणीही पत्रात केली आहे. सरकारने परवानगी दिल्यास कोविड एसओपीचे योग्यप्रकारे पालन करून केशकर्तनालयातील कामे करू असे संघटनेने म्हटले आहे.