केरळमध्ये भूस्खलनात १४ जणांना मृत्यू

0
145

केरळमधील इडुक्की जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळ असणार्‍या मुन्नार येथून २५ किमी अंतरावर भूस्खलन झाले आहे. त्यामुळे या परिसरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८० जणांची सुखरुप सुटका कऱण्यात आली आहे. गावाला जोडणारा पूल पावसात वाहून गेल्याने तिथे पोहोचण्यात अनेक अडचणी असून संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बचावकार्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत मागितली आहे. सकाळी ११.३० वा. घडलेल्या या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला.