केरळमधील लॉकडाऊन २३ मेपर्यंत वाढवला

0
148

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केरळमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनचा अवधी वाढवण्यात आला आहे. केरळमध्ये आता लॉकडाऊन २३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी याबाबतची माहिती दिली. केरळमध्ये लॉकडाऊन १६ मेपर्यंत होता. मात्र कोरोनाचा फैलाव आणि रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आता एका आठवड्यांचा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम, त्रिशूर आणि मलाप्पुरममध्ये कडक लॉकडाउन लावला जाणार आहे. या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केरळमध्ये गेल्या २४ तासांत ३४,६९६ कोरोनाबाधित आढळले असून ९३ जणांचा मृत्यू झाला आहे.