स्पुतनिक लशीची एका डोसची भारतातील किंमत ९९५ रुपये

0
107

रशिया निर्मित ‘स्पुतनिक व्ही’ या कोरोना प्रतिबंधक लशीची किंमत भारतातील किंमत ९९५ रुपये असल्याचे काल जाहीर करण्यात आले. डॉक्टर रेड्डी लेबोरेटरीजने ही माहिती दिली. रशियातून आयात करण्यात आलेल्या स्पुतनिक या लशीची किंमत मूळ किंमत ९४८ रुपये असून ५ टक्के जीएसटी (४७.४० रुपये) मिळून प्रत्येक डोससाठी लाभार्थींना एकूण ९९५.४० रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु, भारतात निर्माण करण्यात येणार्‍या स्पुतनिक व्ही’ या लसीच्या डोसची किंमत मात्र थोडी कमी असेल. नागरिकांना स्पुतनिक व्ही’ लशीचे एकूण दोन डोस घ्यावे लागतील. त्यामुळे दोन्ही डोससाठी लाभार्थींना २ हजार रुपये मोजावे लागतील.