कुलगुरू पदासाठी ५ जणांची नावे सादर

0
63

गोवा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी निवड समितीने पाच नावांची यादी सादर केली आहे. त्यामुळे आता लवकरच या पदावर योग्य व्यक्तीची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

गोवा विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीने या पदासाठी अंतिम पाच उमेदवारांची निवड केली असून, त्यांची यादी काल सादर केली. नव्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा चालू आठवड्याच्या अखेरीस केली जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी एकूण २६० जणांनी अर्ज केला होता, त्यापैकी २३ जणांच्या नावांची निवड करून त्यांची मुलाखत घेण्यात आली होती.

त्यातून आता अंतिम पाच जणांची नावे निश्‍चित करून त्यांची यादी सादर करण्यात आली आहे. दरम्यान, गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. वरुण साहनी यांचा कार्यकाळ १८ ऑगस्टला संपला होता. त्यानंतर प्रभारी कुलगुरूपदी प्रा. जनार्थनम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.