कुंकळ्ळीतील अपघातात पर्यटकाचा मृत्यू

0
126

देमानी कुंकळ्ळी येथे काल रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास व्हिंजर व्हॅन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी चालविणारा पश्‍चिम बंगालमधील पर्यटन जागीच झाला तर मागे बसलेला पर्यटक गंभीर जखमी झाला.

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात जखमी पर्यटकावर उपचार सुरू आहेत. मृत व जखमी पर्यटक पश्‍चिम बंगालमधील रहिवासी आहेत. रेन्ट अ बाईट स्कूटरने राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना देमानी कुंकळ्ळी येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातामुळे सुमारे तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला. देमानी कुंकळ्ळी येथे रस्ता अरूंद आहे. याठिकाणी मागील आठवड्यात अशाच प्रकारचा अपघात झाला होता. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलीस तपास करीत आहेत.