पर्यावरणपूरक उद्योगांना गोव्यात प्राधान्य ः प्रभू

0
126

गोव्यात पर्यावरणपूरक उद्योग सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकाराशी बोलताना काल दिली.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयातर्फे गोव्यात फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय उद्योग मेळावा आयोजित केला जाणार आहे, असेही केंद्रीय मंत्री प्रभू यांनी सांगितले.

केंद्रीय उद्योगमंत्री प्रभू यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आल्तिनो पणजी येथील सरकारी निवासस्थानी भेट घेऊन उद्योग- व्यवसाय या विषयावर काल चर्चा केली आहे. त्यानंतर कला अकादमीच्या आवारात डॉ. सावळो केणी जन्मशताब्दी समितीने आयोजित खास कार्यक्रमाला उद्योगमंत्री प्रभू यांनी उपस्थिती लावली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री प्रभू म्हणाले की, गोव्यात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांना जास्त प्रोत्साहन दिले जाणार आहे. औद्योगिक विकासासाठी राज्य सरकारला आवश्यक सहकार्य केले जाणार आहे, असेही मंत्री प्रभू यांनी सांगितले.