Home Featured किनारी पंचायतींना 30 मार्चपर्यंतप्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश

किनारी पंचायतींना 30 मार्चपर्यंतप्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश

0

हडफडे-बार्देश येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील भीषण अग्नितांडव प्रकरणातील स्वेच्छा दखल याचिकेत किनारी भागातील ग्रामपंचायतींना येत्या 30 मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले. गोवा खंडपीठाने या प्रकरणात पंचायत खाते, किनारी भागातील ग्रामपंचायती, बर्च नाईटक्लबचे मालक, सहमालक, माजी सरपंच व काही सरकारी खात्यांना व इतर मिळून 50पेक्षा जास्त जणांना प्रतिवादी केले आहे.